[email protected], (०२३४६) २२६६१०,२२९०२६
[email protected], (०२३४६) २२६६१०,२२९०२६
Dear Customer, We have launched Video KYC facility for New customer to open savings ac
जीवघेण्या सावकारी पाशातून सामान्य माणसाचा गळा मोकळा करुन त्याला निरामय श्वास घेण्याचे सुख देण्याचे स्वप्न मनाशी बाळगून काही सेवा भावी व्यक्ती,गावातील शेतकरी व कामगार यांना सोबत घेऊन मा. ज्ञानदेव विठोबा पाटील(अण्णा) व त्यांचे सहकारी यांनी पलूस सहकारी बँकेची स्थापना २४ फेब्रुवारी १९६६ रोजी केली.
संचालक मंडळाने गावामध्ये जागृती निर्माण केली.ठेवी जमा केल्या जिव्हाळा निर्माण केला. बँकेचे महत्त्व लोकांना पटवून दिले .त्यामुळे चांगलीच जनजागृती झाली. लोकांना बँकेबद्दल आदर वाटू लागला.ठेवीचे फ़ायदे कळू लागले.त्यामुळे कर्ज वाटपातील अडथळे बरेचसे दूर झाले पैशाचा व्यवहार म्हटल्यावर फार मोठा विश्वास संपादन करावा लागतो. तो विश्वास बँकेने निर्माण केला. दोन हजार रुपये कर्ज म्हणजे खूप अशी अवस्था असलेल्या बँकेने आज ३०० हुन अधिक कोटी रकमेचे कर्ज वाटप केले आहे.तसेच ४०० हुन अधिक कोटी रकमेच्या ठेवी आज बँकेमध्ये आहेत
१९६९ साली सुरवातीला बँकेचे कार्यक्षेत्र ५ मैल होते ,ते वाढले १६ कि. मी परिसरात पलूस , सावंतपूर,आमणापूर,बांबवडे असे विकसित झाले व आज बँकेचे १५ शाखा व संपूर्ण महाराष्ट्र इतके कार्यक्षेत्र आहे .सुरवातीला बँक चालू करताना भाड्याची इमारत घेवून जागेचा प्रश्न सोडविला अंतर्गत प्रशासकीय कामासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडील एजेंट श्री. डी . के . जमदाडे साहेब यांना परमसेवा म्हणून आणले व बँकेचे कामकाज सुरु केले .बँक सन १९६६ ते १९८५ पर्यंत भाडयाने इमारतीत काम करीत होती. बँकेला स्वता:ची इमारत असावी म्हणून संचालक मंडळाने सन १९८६ मध्ये स्वत:च्या मालकीची भव्य इमारत उभी केली. इमारत बांधकामकालीन संचालक मंडळाने त्यावेळी अत्यंत परिश्रम केले.सन १९७२ साली देशात भीषण दुष्काळ पडला. त्यावेळी दुष्काळ निवारण करण्यासाठी शासन सर्व उपाय योजना राबवित होती. कितीही मदत उपलब्ध झाली तरी लोकांच्या प्राथमिक गरजा संपत नव्हत्या.
दुष्काळ सालात बँकेने आपल्या सभासदांना सोने गहाण कर्ज व साधी कर्जे उपलब्ध केली.ग्रामीण भागातील बँक म्हणजे गरीब, मजूर,कष्टकरी ,व्यापारी , शेतकरी ,कामगार यांचा आधार . खाजगी सावकारी म्हणजे जनतेसाठी मारक औषधच . सामान्य जनतेची पिळवणूक नष्ट व्हायची असेल तर बँकेचा आधार हवा यासाठी बँकेने सामान्य ग्राहकाच्या अडचणी लक्षात घेवून वेळोवेळी नियम , व्यवहार , कायदे संभाळून त्याच्या व पर्यायाने गावच्या अर्थव्यवस्थेस हातभार लावलेला आहे.
पलूस सहकारी बँकेने गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील मजूर, शेतकरी , व्यापारी वर्गाला कर्ज वाटप करून फार मोठे सहकार्य केले आहे. यामुळे गावातील बेकारी कमी होण्यासाठी फार मोठी मदत झाली आहे . बँकेने भागातील होतकरू व गरजू लोकांना नोकरी देवून त्याच्या कुंटुबाला आधार दिला आहे . सध्या बँकेचा वटवृक्ष चांगलच फोफावत असून ,या वटवृक्ष्याखाली ठेवीदार , कर्जदार, हितचितक व बँक कर्मचारी यांना मायेची सावली उपलब्ध झाली आहे